By Yogesh Dudhate
तुम्ही सजला अशा या कृष्णरंगात,
तरी प्रश्न तुमचा काहो दंगलात
सोडू चला शब्दांचा गुंता,
नुसते रूपातच असे काहो रंगलात
हृदयांची जागा जिथे, घ्या आम्हाला त्या मिठीत
विरह नको आता इथे, बांधू स्वतः ला त्या गाठीत
इवलुसा जरी जीव माझा,
योगी तो आता तुझ्या मुठीत
स्पर्शाने तुझ्या अपेक्षांची फुलं हि फुलावी
प्रेमाच्या भवसागरात इच्छेची जशी नाव तरावी
पुरे झाले आता हे योजनांचे अंतर
एकाकी या नावेला स्वीकार रुपी काठ तू मिळावी
दूर जेंव्हा जिवलगाच्या बोल कधी ना थांबली
नयनस्पर्श होताच तुझा अबोली भाषा हि रंगली
नकळतच ओठांवरती हसू हि उमटले
हे खरे कि स्वप्न ती भुरळहि चांगली
ना चंद्र तू ना सूर्य मी
प्रेमात जरी किती दूर ती
हां श्वास तू अन प्राण मी
क्षणात भासे तू ओढ ती
तू आहे म्हणुनी अर्थ मला
सर्वगुण तू अन संपन्न मी