By Vivek D Joshi

बंदूकीचे आवाज झाले
बंद झाले गाव,दुकाने
वृत्तपत्रांनी भरले लाल रकाने .
हे कसे अन् कुठले
हिंसेचे वादळ उठले
मानवतेला लाजविले.
बुद्धी आणि क्रौर्य एकवटलेले
हे मानव माजले दानवलेले
मानवतेस काळिमा फासलेले
हे सत्ता ,संपत्तीचे लोभी
रामराज्यातले रावण अन् धोबी
दुष्ट दुर्जन दु:शासन मतलबी
हे वेडे उनाड मातलेले
लावारीस बदनामलेले
माय बापाचे रक्त प्यालेले
अतीरेक्यांनो थू तुमच्या जगण्यावर
थू थू निरापराधी मारणाऱ्यांवर
थू अतिरेक्यांनो तुमच्या मरण्यावर ...!