By Vaishali Tayade

आता मुली नाही तर
मुलं घडवण्याची वेळ आली आहे.
डोळे दिले आहेत पाहायला ,
पण त्यांची नजर बदलण्याची वेळ आली आहे.
स्त्री ही आई, बहीण, मुलगी काहीही असू शकते.
पण..
ती उपभोगाची वस्तू नाही,
हे सांगायची वेळ आली आहे.
जसं धरती मातेला ओरबाडून भकास केलंय सगळं,
तिला तरी सोडा आता,
तुमचं अस्तित्व धोक्यात जाण्याची वेळ आलेली आहे.
सोप आहे सगळं,
काहीच करावे लागणार नाही.
बदलेल तुमची वृत्ती, नजर
तर तिला असं बेमौत मरावं लागणार नाही.
मेणबत्ती, आंदोलनं हे फक्त काही काळ,
एकदा का ती उठली आणि लढली तर,
सृष्टीचा अंत तिच्याच हातून होईल...
हे भविष्य अटळ आहे.