उठा रणरागिणींनो – Delhi Poetry Slam

उठा रणरागिणींनो

By Vaishali S. Kharge

उठा रणरागिणींनो, उठा झाशीच्या राणींनो
लेखणीसावे धरा हाती तलवारी, सावित्रीच्या लेकिंनो

तू ना अबला, तू ना अजाण
तूच सर्व जाणसी, तूच सुजाण

नको करुस विनवणी त्या माधवा
तूच तुझा अपराधी आता वधावा

पुसून टाक ते अश्रू, घे धगधगती ज्वाला हाती
जाळून टाक ज्यांनी धरील्या 'त्या' नजरा तूझ्यावरती

बोकाळलेत क्रूर असुर रस्तोरस्ती
ओढा असुडाचे छापे त्यांच्या पाठीवरती

कर नवरात्रिंचा जागर, दाव दुर्गेचा अवतार
महिषासुर अती जन्मले तूच करिसी त्यांचा संहार.


10 comments

  • आशय उत्तम, शब्द रचना पण खूप छान आहे
    तू आणखी चांगल्या कविता करू शकशील याची खात्री आहे. बेस्ट लक 👌🌺

    अनिल खेडेकर
  • Congratulations
    Beautiful poetry. I never knew this quality.
    Keep it up

    Medha Math
  • अप्रतिम रचना….. प्रेरणादायी कवन….
    वैशु….. खूप शुभेच्छा

    Snehal Ankush Chavan
  • वैशाली तुझ्या कवितेची मांडणी सुरेख आहे. कविता वाचताना मला असं जाणवलं ……..
    तुझ्या लेखणीची धार
    जशी भवानीची तलवार

    Swati Shirsat
  • वास्तव वादी कविता..खूप सुंदर.. अशीच छान छान कविता लिहित जा.. . …वैशाली.All the very best wishes

    Manisha Abhijit Patankar
  • Khoop sundar 👌👏👏
    Nari shaktila prerna denari aani strila prabal banavnari bhavna aahe.

    Trupti Shelke
  • Khoop chhan vaishali 👌🏻aashich kavita karat raha👍🏻

    Megha sanjay Deshmukh
  • खूप सुंदर 👌👌👍👍……… आम्हांला तुझ्याकडून आणखी कविता ऐकायला मिळाव्यात.
    खूप शुभेच्छा 🎉🎉

    पूर्वा सावंत
  • प्रेरणादायी कविता आहे. स्त्री च खरं रूप उत्तम रित्या मांडलं आहे. तिला स्वतःच्या शक्तींची जाणीव करून ती योग्य तिकडे वापरायला देखील सांगितलं गेलं आहे.

    Vaijayantimala Dighe
  • खूपच छान वॆशाली.
    हा तुझा पॆलू माहितच नव्हता मला.

    सॊ. तन्वी सावंत

Leave a comment