By Bharati Mukul Chavan- Patil

तुला बघावे रोज, असे काही नाही
तुला सांगावे गूज, असेही काही नाही
तुझे जपावे मन, असे काही नाही
तुझे मानावे ऋण, असेही काही नाही...
तुझी बघावी वाट, असे काही नाही
तुला बघत व्हावी पहाट, असेही काही नाही
तुझी यावी आठवण, असे काही नाही
तू करावे सांत्वन, असेही काही नाही...
तू माझे व्हावे, असे काही नाही
मी तुझेच रहावे, असेही काही नाही
तुझ्या माझ्यात काही आहे, असे काही नाही
तुझ्या माझ्यात काहीच नाही, असेही काही नाही..!