By Sachin Pradip Khare

आमचे वय वर्ष असेल सोळा ते अठरा
आता कळतं आम्हाला असा असे नखरा
त्यांचे अजब वागणे करी तुम्हाला चूप
जरी त्यांच्यापेक्षा दुनिया पहिली खूप
काहीही सांगा पाहिले येते "जरा थांबा"
काम होतंच नाही होई सगळा खोळंबा
कपडे, बूट, अंगठ्या सगळं असतं भारी
कटिंग ची स्टाईल असते एकदम न्यारी
वूट अमेझॉन नेटफ्लिक्स असे मोबाईलवर
सराईत बोटं त्यावर फिरती अगदी भराभर
वेध लागलेले असतात कॉलेजला जायचे
स्वप्नं पडू लागतात क्लासेस बंक करायचे
कधी अचानक खूप जबाबदारीने वागतात
नक्की कशी आहे जनरेशन हे प्रश्न पडतात
सगळेच वागणे बोलणे वाटते कसे अजब
व्यावहारिक वागण्यात आहेत मात्र सजग
नाविन्याचा हाती धरला आहे त्यांनी कासरा
तंत्रज्ञान ऑटोमेशन त्यांच्या जीवनाचा आसरा...
Farach mast. 👌👍
Must 👌
खुपच छान 👌
एकदम बरोबर
Excellent poem.. Very true …