By Priyanka Bahutule

The inspiration for this poem came to me as a response to my dad's poem, depicting a man addressing his concerns to God and questioning him to show his existence. It is a small attempt to see what He might be wanting to tell us.
कसं सांगू जगाची हुरहुर, मला सतत लागून राही;
चित्त हरवलेलं वेड्या काही तुझ्या एकत्याचच नाही!
हात पसरलेला माझ्या पुढ्यात, तुला पाहून मीही रडतो दगडाच्या देहाला माझ्या शेवटी मायेचा पाझर फुटतो
वाट दाखवून तुला, डोळी आस लावून बसतो
कसा तरण्या शिक्षील एकटा, याचीच काळजी करत निजतो
सच्या मनाची तूझी पुण्ये मीही रोज मोजतो
त्या नादात मात्र दूसऱ्यांच्या पापाचा आकडा चुकतो
भरताच शंभर अपराध कुणाचे मी सत्याचा मार्ग धरतो
पण खरं सांगू कारे हल्ली पापांचा घडा लगेच भरतो
श्रीमंतांच्या लाचेने मीच शरमेने लाजतो
कुणा गरीबाच्या चिंतनात पुन्हा खरा भक्तिभाव भासतो
पैसे देऊन बाप्पे मला गाभाऱ्यात शोधत येतात
मी असतो तेव्हा गर्दीत कुठल्याशा जिथे खऱ्या शपथा लोक घेतात
जगमान्य नियम काही नेहमी मोडेन मीही ठरवतो
पण प्रत्येक वेळी नेमका काळ मलाही हरवतो
मी नसल्याचा निश्चय करून मग तुझ्यासारखा कुणी रुसतो तुमची दुःख पाहून कारे मीही का कधी हसतो?
पाहून पृश्विची दैना मनातून मीही पूरता खचतो
मग भेटण्या तुम्हा येण्यास मी निसर्गात खेळी रचतो
किती पूरा पडणार मी? अखेर मलाही उसंत नसतो
म्हणून घरोघरी मी माऊलीच्या रुपाने बसतो !