इंद्रधनुष्य – Delhi Poetry Slam

इंद्रधनुष्य

By Priya Modak

नभातले ते इंद्रधनुष्य पश्चिमेस ते प्रकटते
सात रंगांची स्वप्ने तिथल्या मनामनात रुजविते

पाहतास त्याकडे कधी,कुणास दुःख न झाले
उलट त्याच्या निर्मीतीबद्दल अनंत प्रश्न मनात आले

ऊन आणि पावसाचा,आपल्या पलिकडचा हा खेळ
दोघांमधला आहे सुंदर,अबोल असा अनोखा मेळ

सुख आनंदाचे हे मिश्रण उरी तुमच्या क्षणिक वसे
सप्त रंगांची ही उधळण,प्रुथ्वीला जणू साज दिसे


Leave a comment