By Pradnya Mate
वेळ केव्हा थांबते ,थांबतात तर माणसं
कधी तरीच निघून गेलेल्या छोट्याशा क्षणात
कधी कुणा माणसात
एकेकाळी रडलेल्या अश्रू मध्ये
कधी अलगद आलेल्या हसू मध्ये
खट्याळ आठवणी च्या लपंडावा मध्ये
वेळ केव्हा घेते विश्रांती ,वेळ कुठे थांबते ,
तीच हवीशी माणसं आणि नकोसा एकांत
गुंफत दिवसा मागून दिवस निघून गेले .
जिवावर नाही आणि माणसावरही नाही
मन स्वतः तच गुंतून राहिले
विचार, अविचार सगळे जणू अर्धवट च सुटले
आयुष्याची वजाबाकी केली पण बेरीज करायचे राहिले
भागवली अर्धीच तहान, भूकही भागवली अर्धीच
धास्तावलेले शब्द बोलत कविता ही सोडल्या अर्धवट
स्वप्न अर्धे, अर्ध्या च आशा , पार केला अर्धा च रस्ता आणि
अर्धे आयुष्य जगत जगत अर्धे मरण पण समोर आले.
उद्या पण रात्र सारून प्रकाश येणार
स्वप्न मात्र अर्धवट च राहणार,
करायचे होते ते करायचे राहून गेले
वाटत की जगायचे राहून च गेले
पण परतला तो वसंत , पुनः नटवले हे अस्तित्व
साठवले ते दवबिंदू आणि फुलली ती पालवी
ऊन सावली शी खेळत बहरले माळरान आणि
फुलोर्यातील एकेक कळी देती एकच ग्वाही
की
शोध माझा ,शोधणारी मी
खेळ माझा, खेळणारी मी
शब्द माझा, मोडणारी मी
छळ माझा आणि छळणारी ही मी
जुने काही विसर्ण्या साठी
रोज नवीन लिहिलं मी
कितीही छळले बागेत फुलांनी
पाचोळ्या वर पडूनही फुलेल मी