By Harshada Lonkar

देवा तू दिला जन्म ह्या जीवाला,
पण त्याच्या समस्या कुठे सोडवल्या!
मनात विचार प्ले स्टोर शिवाय झाले इंस्टॉल,
कितीपण प्रयत्न केले तरी नाही होत उनिस्टॉल!
मेंदूचा झालाय हँगओव्हर,
बॉडी गेलीये वायब्रेट मोडवर,
तूच सांग कसं करू क्लिअर,
दिसत नाही मला फ्युचर्!
बोलता येत नाही कारण झालोय मी सायलेंट,
राग आल्यावर तर सगळेच होतात व्हॉइलेंट,
कधी कधी वाटतं होऊन जाऊ स्वीचओफ्फ,
पण बॅटरी चा संपत नाही चार्जे!
देवा च्या मनात नाही तोवार,
होणार नाही बॅटरी डाउन!
काम करण्यासाठी लागतो बुस्ट,
पण झालोय मी रोस्ट!
बॅटरी चा झालाय प्रॉब्लेम,
देवा रिपेअर करुन दे सोल्युशन,
स्क्रीन लाईट कर फुल,
दिसुदे फ्युचर कूल.