बाभळीची बाग – Delhi Poetry Slam

बाभळीची बाग

By Kleeb (Tejaswini Joshi)

बाभळीची बाग माझी,
फुलली तर फुले नाहीत,
रुतायाला काटे मला,
फुलायाची बाब नाही।

दफन करतानाही देह,
लाकडाला काटा नाही,
दफनभूमी बाग माझी,
मृतातून वृक्ष येई।

कृत्य माझे प्रेम काही,
पाखरांची आस राही,
काट्यांमुळे मेले सारे,
साप–सत्य, स्वप्न–ग्वाही।

त्याच्या कत्तलखान्यामध्ये,
आमची आता होती बारी,
ती झाली दोषमुक्त,
आमच्या आत्म्यास मुक्ती नाही!

कुठे आहे देवभूमी?
कुठे आहे स्वर्ग–हमी?
तुझ्यापासून कारण आले,
सारे झाले देवद्रोही।

कुठे आहे धर्म–कर्म?
कुठे आहे जात–मर्म?
वाळितही फुललेल्यांना,
तूच सर्व, तूच पर्व!

प्रेम असते पराकाष्ठा,
तुझे ओठ माझ्या ओठा,
सप्तरंग रुसल्यावरती,
काळे ढग कशाकरता?

सौंदर्याचा साकी तू,
मदोन्मत्त ऋषी–मुनीही,
मय म्हणावे, मधू म्हणावे,
तशी असावी सुरा तुझी ती।

जाळ बाग जशी–तशी ती,
तुला काटा रुतू नये,
रुतता त्यांची फुले झाली,
तर मजला माफी दे।


Leave a comment