Kajal Pawar
प्रकाशाच्या आशेने पाखरू आंधरात भरकटल
ज्याच्यावर प्रेम केलं साक्षीने त्याच साहिल ने तिला ठार केलं.
ज्याच्यावर ठेवला विश्वास तिने त्यानेच केला तिचा घात
कसला रे हा लवजिहात ??
सर्व मुले सारखी नसतात म्हणत म्हणत मुली अश्या फसतात
खूप प्रेम करणारी मुले अशी अचानक कशी बदलतात ??
निर्दयीपणे भर रस्त्यात करत राहिला वार ,मन नाही भरले म्हणून केले दगडाने ठार !!!
मानेतून निघत नव्हते हत्यार तरी खोपत राहिला..
अंगावर काटा देणारे दृश्य हा
समाज गंमत म्हणून बघत राहिला ??!!
घटना घडते वार्ता पसरते
सुरू होतात टिव्हीवर ही बातम्या !! ( समोर येत ते एकच वाक्य .....)
प्रेम प्रकरणात तरुणाने केली तरुणीची हत्या!!!!
मग शासनाने प्रकरण हायकोर्टात नेल हेच येतं कानी...
पण त्या आई - वडिलांची गेलेली लेक आणू शकेल का परत कोणी ???
एकाने केले ३६ तुकडे
हजारो नराधमांनी केले मनिपुरात स्त्रियांना उघडे !!!
जणू पांडव बसले लपून घरात कौरवांनी मारली बाजी ...
आजकालच्या जगात कोणी बनू शकेल का राजे श्री छञपती शिवाजी???
भ्याड मानवाने स्वार्थ निवडला मात्र या कलियुगात द्रोपतीला श्री कृष्ण नाही मिळाला ... द्रोपतीला कोणी भाऊ नाही मिळाला ..
उज्जैन ची चिमुकली नग्न अवस्थेत मैलोनमैल भटकली
बापासारख्या पुरुषांवर ठेवला विश्वास तिने....
काय तिथेच ती चुकली???
फक्त म्हणायला झाले ओ...
स्त्रीला मिळाले स्वातंत्र
खरंच एक माणूस म्हणून तरी पुढे जावू देते का हे लोकतंत्र ???
बलात्कारानंतर ही देतात मुलींच्या च कपड्यांना दोष
पण पुरुषांमधील राक्षसांचा घेईल का कोणी शोध ????
शासन करते फक्त हत्याराला कटघर्यात उभे..
करून करूंन करणार तरी काय कायदा म्हणून....
हत्यारा रचत असतो दुसरे मनसुभे !
काहींना मिळते जन्मठेपेची शिक्षा
तर काहीं ना मिळते कित्तेक वर्षांनी फाशी ...
अजून पोरीला न्याय मिळावा नाही म्हणत कित्तेक वर्ष आई- वडील राहून जातात उपाशी ...
का नाही विचार करत माणूसच माणसाचा ???
का नाही मिळवू देत माणूसच माणसाला न्याय ???
का भोगावा लागत फक्त एका पीडित स्त्रीला ??
खरच माणूस माणुसकीचा धर्म विसरला की काय ???
माणसातील माणूसपण हरवल की काय ????