By Jyoti Kiratkudve
माणूस म्हणुनी जन्म घेतला
मानवतेचा धर्म आपुला
माणूस असूनी माणसाने
माणुसकीचाच अंत केला
कधी द्वेष तर, कधी वासना
कधी चोरी तर कधी क्रूर यातना
खून करिती मानवतेचा
माणसाच्या या दुष्ट भावना
नको लबाडी नको वासना
नको यातना लोभापायी
मानवहिताचे कार्य करुनी
सद्गुण आपुल्या अंगी येई
जपुनी मानवतेचे नाते
कर्म आपुले स्वछंद असावे
माणुसकीचा उद्धार करुनी
सर्वांवरती प्रेम करावे
आपुलकीने जपूया नाते
माणुसकीचा अंत नको
माणूस म्हणुनी जन्मास आलो
मानव धर्माचा विध्वंस नको