By Jitesh Potdar

विश्वास ठेवला मी जरी स्वतःहून तुझ्यावर l
घात केलास माझा परी का? हा अविश्वास माझ्यावर ll१ll
आसक्ती होती तुझ्वर मजला म्हणून जवळ तुझ्या मी आलो आहे l
दूर लोटलेस तूच मला, का ही सक्ती तुझीच आहे ll२ll
तू येणार नाहीस कळले.. वाटले वाट पाहणे व्यर्थ आहे l
समोर आल्यावरही ओठ मुकेच आपुले; अशा भेटण्या सांग काय अर्थ आहे ll३ll
दोष नाही कुणाचाच यात, मग रोष हा व्यर्थ आहे l
मर्यादेपलीकडे प्रेम करण्यात; आज कळले काय अर्थ आहे ll४ll
काळीज माझे तुजला, मी कधीच देऊन टाकले आहे l
तुझ्यावरील माझ्या प्रेमाचा हा आगळा आवेश आहे ll५ll
अजूनही तुझे प्रेम प्रिये, मजवरी जडलेले आहे? l
का, उगीचच मनात हा भासांचा प्रवेश आहे ?? ll६ll
मला भेटायचे तू टाळीत गेलीस, तुझ्या काळजाला तूच जाळीत गेलीस l
तुझ्यातले काळीज ते, माझेच होते; अन छाती वरती घाव माझ्या ते तुझेच होते ll७ll
विकलो गेलो असतो जरी, दुनियेच्या मृण्मयी बाजारात मी l
फुकट माझे सर्वस्व देऊनी परी, तुजला चिन्मयी बनवून टाकीले मी ll८ll
आधीच आपण एकमेकांशी हार व्यर्थ मानली आहे l
मग इतरांशी जिंकण्यात शान व्यर्थ आपुली आहे ll९ll
शर्थ केवळ तुझ्याचसाठी मी जिंकणार आहे l
सार्थ करण्या 'जितेश' माझे नाव आहे ll१०ll