By Gayatri Baviskar

गवळणीला लागलेला कृष्णाचा लळा,
कृष्णाला लागलेला यशोदेचा लळा,
अखेर तो क्षण आला,
जबाबदारी ने हाक मारली, " मागे वळू नको बाळा"
क्षणांत सारं विसरूण दाटून आला गळा.
सोडूनी गोकुळास बा रे चाललास,
राधेच्या विरहात निःशब्द का झालास?
तोडूनी ती नाळ,
आला तो काळ.
लिहिले भाळी, करावे कर्म,
सोडता न आला धर्म,
समजावे लागले यातले मर्म.
ही गवळण अडायची नाय,
ही गवळण रडायची नाय,
जोड घुंगरांची पावलात,
प्राण येऊ दे,
हा विरह सहन करायचे बळ येऊ दे.