By Ganesh Debe
आज मन म्हनालं, तिला कव्यामधे मांड
मी म्हणालो, तूच काही सांग
कवी माणूस तू तिच्यापुढे नमला ?
मी हसत म्हणालो,
बाळा, तिच्या स्मरणात तर वेळ पण दमला
आणि तिला काव्यात कस मांडणार ?
तू पण तर तिच्यात रमला.
अरे गंधामध्ये तिच्या कस्तुरी ही रमेल
आणि रुपापुढे तिच्या अप्सरा ही नमेल
तो चंद्र ही त्या दिनी अमावस्येला दिसेल
जर प्रेयसी माझी थाटात सजेल.
सुर तिच्या बोलीचा असा मुग्ध करेल कानी
जनु कोकिळेच्या बोलीतली बोलकी ती वाणी
तिच्या बद्दल सांगायला भरपूर तर नाही
पण बघाया तिला एक होई आग आणि पाणी
पाण्याला त्या उष्णता भासे आणि आगीला त्या गारवा,
जेव्हा पैंजण ची धून छेडत येई घालून चुडा ती हिरवा
जेव्हा मला ती भेटली मनातली गोष्ट सांगितली
सौंदर्याचा साज तुझा तो, अपुरा विना त्या टिकली
रूपाने गोजिरी ,मनाने साजरी
माझी प्रेयसी जणू त्या कृष्णाची बासुरी
बासुरी च धून ती, जुळलेलं मन ती
अनमोल क्षण ती, कुबेराच धन ती
तिच्या बद्दल सांगायला नाही रे काही
ती समोर आली की मन काही बोलतच नाही
मना वरून आठवलं मनानीच होत विचारलं
आता विचारू जरा त्यालाच, त्याला आहे ना कळलं ?
ए मनाऽऽ ए मना...
हा पुन्हा तिच्यात रमलाय वाटतं !!