By Devesh Pale
नाराज ती कोणालाच नाही करायची
प्रत्येकासाठी काही ना काही तरी करायची
पण कुठेच अडकून नाही रहायची.
काय करायच होत तिला माहीत नाही
पण जे पण करायची चांगलच करायची.
ना कोणी आवडत होत ना कोणी नावडत
सगळ्यां सोबत सारखच वागायच हेच तिला माहीत होत.
डोळ्यांत तिच्या नेहमी आभाळ दिसायचं
पण जमीनीशी तीच नातं कधिच नाही तुटायच.
लांब कोणीच नव्हतं सगळेच तिच्या जवळ होते
पण सगळ्यांसोबत असूनही ती सगळ्यांपेक्षा वेगळी होती.
पंखांमध्ये तिच्या वेगळच बळ होत कारण
भावनांच्या जाळ्यामध्ये तिने स्वतः ला अडकवल नव्हत.
कोण होती ती? कुठे गेली ती? माहित नाही
पण जाताना मनात कायमची जागा करून गेली होती,
पण जाताना मनात कायमची जागा करून गेली होती.