By Deepti Naykodi
आयुष्याची पानं, ही कवितेच्या पानांसारखी असती तर..
आपल्याला जे हवं आणि जशी हवी,
तशी ती पानं लिहिता आली असती तर..
आपल्या मनातील सुंदर भावना आपल्याच शब्दात
त्या पानांवर उमटवता आली असती तर..
भावनांच्या कल्लोळात उमजून कोरी सोडलेली काही पाने
पुन्हा गिरवता आली असती तर...
व्यक्त होऊनही अव्यक्त राहिलेली कल्पनेतली ती अक्षरे
आयुष्यभर पानांच्या चौकटीत जपता आली असती तर...
ओथंबलेल्या क्षणात विरून गेलेली सप्तरंगी स्वप्ने
शुभ्र पानांच्या ओलाव्यात पुन्हा जगता आली असती तर..
आयुष्याची पानं, ही कवितेच्या पानांसारखी असती तर..