By Achal Thakare

तुझ्याशी बोलायच आहे
बाबा मला तुझ्याशी बोलायचं आहे
गप्पा, गोष्टी मनातले गुज सांगायच आहे
तु जो कधी मनातलं उघडत नाही
ते तुझ्याशी बोलायच आहे.
मला मिळणारा प्रत्येक क्षण तुझा आहे
माझ्या प्रत्येक निर्णय तु आहे
माझ्या प्रत्येक सोज्वळ वाटेत तुझा वाटा आहे
हे तुझ्याशी बोलायच आहे.
मी हाक मारली की नेहमी तत्पर आहे
माझ्या प्रत्येक कठीण परिस्थितीत तु आहेस
माझ्यासाठी तु आहेस
हे तुझ्याशी बोलायच आहे.
स्वतः च सुख ओझरुण मला हास्य देणारा आहे
माझ्या प्रत्येक चुकीला माफी देणारा आहे
मी तुझी लेक आहे
हे तुझ्याशी बोलायचं आहे.