By Akash Wankhede

आज बाजारात, खूप गर्दी होती !
झुंबड लोकांची चौकात दिसत होती !
जवळ जाता तिथे, बोली लागली होती!
विविध नात्याची, इथे हराशी सुरु होती !
भावफलक नात्याचा, किंमत वर खाली होती!
आवडीनुसार लोकं नातं, खरेदी करत होती!
काही नाती सेलमध्ये, ठोक भावात होती!
त्या सेलच्या काउंटर वर , भीड अधिक होती
काही दलालांची बाजारात, मोनोपॉली होती !
त्यामुळं टिकाऊ नाती, मात्र तुटत होती!
किंमत जास्त लागते, जर देखनि ती नाती!
पण घरी पोहचे पर्येंत, हाती उरते माती!
भाजीपाल्याच्या किमतीत, मिळतात नातीगोती!
शाबूत नाही सांभाळी , तर निराशा येते हाती !
विक्रीला बाजारात विविध, आहेत नाती !
कवडीमोल भावात, विकली जाते माणूसकी !
लीलावातील हि तकलादू, टाकाऊ नाती !
दलाल मात्र सोडत नाही , घेणे त्याची दलाली !
आज बाजारात , खूप गर्दी होती !
झुंबड लोकांची चौकात दिसत होती !
जवळ जाता तिथे, बोली लागली होती!
अनेक नात्याची, इथे हराशी सुरु होती !