शब्द... – Delhi Poetry Slam

शब्द...

By Akanksha Patil

शब्द दिला कोणाला तर वचन दिले
शब्दांनी सांत्वना दिली आधार बनले
शब्दांना शब्द वाढले तर वाढ झाले
शब्दांनी शब्दांना मढवले तर साहित्य आले
शब्द-शब्दार्थाची सांगड घालून सुवचन घडले
शब्दांची जोड विचारांना व्यक्तिमत्व घडले
शब्दांचे बाण सोडल्यावर परत घेता येत नाही
शब्दांची जाण कधी कोणी ठेवत नाही
शब्दांनी माणसांना जोडून ठेवण्याची परंपरा आपली
शब्द खाली पाड्डू न देण्याची रीत आहे माणसांची
शब्दाखातर लढणारे योद्धे अन्
शब्दांसाठी जीवही देणारी माणसे
शब्दांमुळेच आता आहेत इतिहासाची पाने


Leave a comment