Abhay Kulkarni
मायेची पाखरं तुझ्या सभोवताली
जणू सर्वांना एकाच वृक्षाची सावली
तुझ्या आशिर्वादाचा सर्वात मोठा आधार
आता हुडकून हुडकून पाखरं होतील बेजार
बेजार होऊनि पाखरू येई तुझ्या दारी
कवटाळून तू घेई आपल्या उदरी
तुझ्या उदरात घुसमटून आम्हांला अजून रडायचं होतं,
तुझ्या प्रेमळ हातानी अजून गोंजारून घ्यायचं होतं
आमची सुखं सांगून तुला आनंदित करायचं होतं
आमची दुःख सांगून तुला सहभागी करायचं होतं
पण तू निघून गेलीस
आमच्यावर रागावून कि कंटाळून
तुझ्या मायेने अतृप्त राहिलेली आमची मनं
तुझ्या आठवणींना उजाळा देत करतील आयुष्याचं सोनं
तुझी उणिव जाणवेल फार
जोपर्यंत सांभाळू आयुष्याचा भार
ईश्वर तुला शांती देवो
तुझा आशिर्वाद तुझ्या पाखरांना कायम लाभो.