BY SAMIKSHA GABHANE
सदैव मुखवट्यातून जगाआडच्या मरुस्थळातून
समुद्राची बघतो मी लहर
कहर न मांडता काढलाही एक प्रहर
अश्रू मनात आटवून, पाहिले डूबताना एक शहर!
मुखवट्यामुळे अश्रू लपलेले आहेत
कदाचित चेहऱ्यावरील हसुमुळेही ते अदृश्य आहेत
प्राण??? ते तर केव्हाचेच गेले आहे!
जो मी आता दिसतो सर्वांना
कदाचित हा मी नसून दुसराच व्यक्ती आहे.
याची कल्पना मलाही नाही की मी आता कोण आहे, काय आहे!
स्वतःला मी जणू पूर्णपणे हरवले आहे...
लोकांना???? त्यांना तरी कसं कळणार मी दुःखी आहे ,
मज आता हसुंचे हजार मुखवटे आहेत !
काय दुःख आणि काय सुख
याचा शोध घेणं आता बंद
खरे तर, दुःखालाच सुखाचे मुखवटे आहेत !
जेव्हा एक-एक स्वतःचाच श्वास घेईल जीव,
तेव्हा कळेल....
मरणालाही जीवनाचे मुखवटे आहेत !
व्यक्ती एक आणि मुखवटे मात्र अनेक
कारण जीवनात सुख एक आणि दुःखे अनेक.
एक-एक करत दुःखाचा अंत करावा
कुणास ठाउक, तोपर्यंत माझाही अंत व्हावा
पण इच्छा एवढीच की तो अंत ही अनंत व्हावा....
मुखवटेही सोबतच संपावे,
आणि अंत झाल्यावरच सर्वांनी मज मुखवट्याविना बघावं
आणि वाटेल तर शोधावं.
तोपर्यंत मी मुखवट्यांना कवच बनवतो
आणि तुम्ही दुःखाचे अवजार
चालू देत हा खेळ कवच आणि अवजारांचा असाच,
मी ही दाखवणार माझे हसण्याचे कौशल्य असाच!
मी तर स्वेच्छेने हरवली माझी वाट,
पण नेहमी वाटले वाचकांची व्हावी नवी पहाट
म्हणून वाटते त्यांच्यासाठी कवितेचे काही घरटे विनावे,
स्वतःच्या अश्रूंची शाही करावी,
सर्वांच्या मनावर कोरावं,
मग त्यांनी तरी मुखवट्याची कात टाकावी,
म्हणून वाटलं की कवी व्हावं!
चांदणी रात होताच,
जगाआडच्या खिडकीत बसून,
कविता वाचताच असंख्य लोकांची, असंख्य मुखवट्यातून सुटका करावी ,
म्हणून वाटलं कवी व्हावं !
लोकांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भावनातील अंतर संपावं,
चेहरा आणि भावनांवरील मुखवट्यापेक्षा
कवितेचे पांघरून बरे, हे कळाव
म्हणून वाटलं की कवी व्हावं.
Incredible! Can’t describe how I felt after reading this…such deep emotions! Never thought I could relate to such deep emotions…
Well !! 😊
Well !! 😊