By Kavita Sangras Kanherikar
अव्यक्त मी , व्यक्त तु .
नको उन्मत्त होऊस मानवा तु.
द्वय पायाचा पशु असुन ,
माझ्या पायाला करतोस कैद
आसुरी आनंद मनवतोस तु .
नको उन्मत्त होऊस मानवा तु .
वृक्ष मीच,पक्षी मीच,किटक मीच.
माझ्या जगात राहतोस नं ?
आक्रमण करुन राजरोस तु .
नको उन्मत्त होऊस मानवा तु .
नाही अपंग मी, नीसंग मात्र तु .
माझेच सेवन ,माझेच हवन .
विसरु नको,निसर्ग मी विसर्ग तु .
नको उन्मत्त होऊस मानवा तु .
सद्गदित मी ,व्यथित, घायाळ मी .
आक्रंदत माझेच श्वास माझेच घास .
सुवासात माझ्या दुर्वास तु .
नको उन्मत्त होऊस मानवा तु .
ममत्व मी ,नको समजू विनम्र मला .
भक्तितून माझ्या विभक्त होऊन.
संपवून माझे अस्तित्व तु .
नको उन्मत्त होऊस मानवा तु .
अव्यक्त मी ,व्यक्त तु .
नको उन्मत्त होऊस मानवा तु .