By Diksha Lingayat
अभीरवर्ण सुंदरतन,
प्रसादत मूर्छीयले चंचलमन;
ते उभे वाकडे राधारमण,
पंकजसम पद-हस्त फुलवून.
नौकेसम, चपळनयन,
पाहता पाहणे नथांबे;
बिंबवूनी तू मदनमोहना,
मज बेलपत्रही तेच दिसे.
जे कोटीचंद्र फीके पाडती ते ;
सखाकृष्ण सर्वश्रेष्ठ अमृतपान;
त्या प्रेमरुपास हेरूनी नूकते मी,
न्हाले, भिजले परमानंदे.
चिंबूनी गेले श्यामरंगे,
आता मिंधूनी चित्तचोर;
अनावर अश्रू झाले,
धावती पाहण्या किशोर.
हे श्याम,सखा, प्रीय,
प्रीत देसी मजसी तू सर्वांगीण;
मायाबंधी मी , कोठे काय प्रेमे तूज,
तूच दे आता मज आज्ञा, प्रेम.
- राधेश्याम-