ती नदी!!!

By Deepti Naykodi 

 

शांत, एकसंथ वाहणारी ती,
तिला कधी कोणी पुसलेच नाही.
पण एकटे वाटणाऱ्या त्या मनाची,
तिने साथ कधीच सोडली नाही.

न मागताही खूप काही देणारी ती,
तिने मनात अपेक्षांच बीज मात्र रोवले नाही.
पण कायम देणाऱ्या तिच्या हातांची,
घेण्यासाठी ओंजळ कधी झालीच नाही.


Leave a comment