By Deepti Kambli
पाऊस म्हणजे ओल्या मातीचा गंध,
पाऊस म्हणजे दरवळणारया मोगऱ्याचा सुगंध....
पाऊस म्हणजे बहरलेले हिरवं रान,
पाऊस म्हणजे नभ आकाशी वेगवान....
पाऊस म्हणजे वाट ती धूसर,
पाऊस म्हणजे मनी दाटते काहूर....
पाऊस म्हणजे कुणासाठी प्रीतीचे क्षण ते बेभान,
पाऊस म्हणजे कुणासाठी आठवणींचे एक तुफान.....