By Pooja Shinde
एैक मानवा मी चैतन्य आहे
वासनेने वेडावलेल्या मानवा
तू दुसऱ्याच अहित करण्यात, लुबाडण्यात
एकमेकाचे वाईट चिंतण्यात
तू वेळ घालविलास.
तू फार वाईट केलातु माणुसकी, विश्वास, निष्टा
या सगळ्याच्या चिंध्या केलास
तुझ्या या वागण्याने मी फार खचून गेलोय रे !
एैक मानवा तू सर्व विसरलास,
प्रेम, वात्सल्य, दया, करुणा
हे सर्व विसरुण,
तु फे तुझा स्वार्थ साधलास,
काय मिळवलस रे शेवटी
वासनेच्या हव्यासा पोटी,
तू देव धर्म, भूक, तहान, नाती विसरलास
लक्षात ठेवलीस ति फे वासना
तुझी वासनेची भूक बहुतेक शमली असेल
पण हरवलेले समाधान कुठे रे शोधणार आहेस !
ऐक मानवा मी चैतन्य आहे
तुझ्या अंर्तमनातला मी देव आहे
उपाशी रहा पण कोणाला लुबाडू नकोस,
स्वत: त्रास भोग पण कोणाला दुखवू नकोस
प्रेमातील ओढ समजून घे वासनेने वेढावू नकोस
एैक मानवा मी चैतन्य आहे,
तुझ्या अंर्तमनातला मी देव आहे,
मानसा मानसातले प्रेम समजून घे
तुझ्या अंर्तमनातला देव समजून घे.