By Dr. Shwetal Nerkar
परत जुळुन आली मन,भावनांचा खेळ परत सुरू झाला.
पण आज न तीच्या डोळ्यात अश्रु होते,न मनात होते वादळ.
होता अजुनही आदर तीला,पण हरवला तो विश्वास होता.
नेहमी गोधंळलेली ती आज आत्मविश्वासाने खुलू लागली,
नात्याला जणू जपत ती स्व:तला परत हरवू लागली.
तरीही काही वेगळे आज घडुनी होते आले,
प्रेम,धैर्य,संयम देखिल तीच्या सौंदर्याने प्रकाशमय होते झाले.
कोण तू ,तुझे नाव काय,अनेक प्रश्न उठु लागले,
खळबडुन जणू मन तिचे प्रश्न तीलाच विचारू लागले.
गालातच हसून ती हळूच त्याला मह्नाली,
हे "मना" दूसरी तीसरी नाही रे कोण्ही, आहे मी तुझीच सावली,अस्तित्व तुझे साकारण्यास दारी आज तुझ्या आली.